ओबीसी एनटी पार्टी ऑफ़ इंडिया - उद्दिष्टे
  • सामजिक न्याय, स्वतंत्र, समता, बंधुता या मूल्यावर आधारित धर्मनिरपेक्ष, एकात्म, लोकशाहीप्रधान व समाजवादी राष्ट्राची उभारणी करण्याचे संविधान स्वीकारलेले ध्येय व उद्धिष्टांशी ओबीसी एनटी पार्टी ऑफ़ इंडिया बांधिल राहील.
  • ओबीसी, भटक्या विमुक्त व शोषितांच्या सामाजिक, आर्थिक परिवर्तनासाठी स्वीकारण्यात आलेल्या कार्यक्रमाची कसोशीने व कार्यक्षमपणे अंमलबजावनी करण्यात सहभागी राहील.
  • संस्थापक, राष्ट्रीय अध्यक्ष श्री. संजय धाकू कोकरे यांच्या सामाजिक क्रांतीचा तत्वज्ञानाचा प्रचार व प्रसार करून आम्हाला मृतवत भटक्या विमुक्तांसह ओबीसी समाज मनातील न्यूनगंड संपवायचा आहे. डोळे असून आंधळे, कान असून बहिरे आणि तोंड असून मुके अशा कोट्यधीश समाज बांधवांना जिवंत, डोळस व बोलके करायचे आहे.
  • मंडल आयोगाच्या शिफारशी लागू करण्यासाठी संघर्षरत राहून ओबीसी एनटी जनतेला सर्वच स्तरावर लाभ मिळवा यासाठी शिफारशीचा प्रसार करणे व सवलती प्राप्त करण्याचा कामी संघर्षरत व प्रयत्नशील राहणे.
  • धार्मिक वर्चस्व, अंधश्रद्धा, अनिष्ट परंपरा, रूढींचे प्राबल्य यापासून ओबीसी एनटी समाजाची मुक्तता करणे.
  • ओबीसीवादी चळवळीचे प्रणेते श्री. संजय कोकरे यांचे क्रांतीचे विचार ओबीसी एनटी समाजबांधवांन पर्यंत पोहचविण्यासाठी प्रबोधनाची मोहिम सातत्याने चालविणे व त्यांच्या विचाराने समाजबांधवांना ओबीसीवादी बनविणे तसेच पिवळ्या झेंडयाखाली ओबीसी शक्ती निर्माण करणे.