ओबीसी एनटी पार्टी ऑफ़ इंडिया पक्षाच्या मागण्या

आम्ही ओबीसी सह इतर मागासवर्गीय समाज समुहांच्या उत्कषासाठी खालील मागण्या केंद्र शासन व राज्य शासनाकडे मांडल्या आहेत.

  • ज्या भटक्या विमुक्तांसह ओबीसी विद्यार्थांकडे जातीचा दाखला आहे त्या विद्यार्थाची जात पडताळणी करू नये.
  • जातिनिहाय जनगणना झालीच पाहिजे.
  • संपूर्ण मंडल आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात.
  • नच्चिप्पन रिपोर्ट लागु करण्यात यावा.
  • बाळकृष्ण रेनके आयोग लागु करण्यात यावा.
  • लोकसभा व विधानसभेत ओबीसींना राखीव जागा देण्यात याव्यात.
  • मराठा समाजाचा ओबीसी वर्गात समावेश करू नये.
  • घटनेविरोधी सर्वोच्च न्यायालयाने लादलेली क्रीमीलेयर अट रद्द करावी.
  • २७% ओबीसी आरक्षणातून इतर कोणालाच आरक्षण देऊ नये.